आगीची धग कायम

By Admin | Updated: May 3, 2015 02:04 IST2015-05-03T02:04:30+5:302015-05-03T02:04:30+5:30

गुप्ता इंडस्ट्रीजमध्ये गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीची धग ४0 तासानंतरही कायम

Fire retention | आगीची धग कायम

आगीची धग कायम

खामगाव : गुप्ता इंडस्ट्रीजमध्ये गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीची धग ४0 तासानंतरही कायम आहे. शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर, बुलडाणा व अकोला येथील अग्निशामक विभागाने गुरुवारपासून लागलेली ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या आगीत गोडावूनमधील ढेप, सरकी, सरकी तेल आदी खाक झाले आहे. जवळपास अडीच कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी रात्री १0 वाजेनंतर खामगाव वगळता इतर अग्निशामक विभागाच्या गाड्या परत वाढविल्या. दोन दिवस चाललेल्या या आगीच्या तांडवात गोडावून पूर्णत: तापल्याने भिंतीला तडा गेल्या. रविवारी सकाळपर्यंत आग संपूर्णपणे आटोक्यात येईल, असे अग्निशामक विभागाचे सहा.अग्निशामक अधिकारी नागेश रोटे यांनी सांगितले.

Web Title: Fire retention