निजामपूर येथे घराला आग

By Admin | Updated: May 11, 2017 07:05 IST2017-05-11T07:05:07+5:302017-05-11T07:05:07+5:30

अचानक आग लागून, २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.

Fire at home in Nizampur | निजामपूर येथे घराला आग

निजामपूर येथे घराला आग

लोणार : तालुक्यातील निजामपूर येथील संजय ज्ञानबा जाधव व संतोष ज्ञानबा जाधव यांच्या घराला ९ मे रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून, २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
निजामपूर येथील शेतकरी संजय ज्ञानबा जाधव व संतोष ज्ञानबा जाधव हे सर्व कुटुंबीयांसोबत शेतीच्या कामासाठी शेतात गेलेले असताना सकाळी १० वाजतादरम्यान अचानक घराला आग लागली. शेजारील घरी व गावात असणाऱ्या ग्रामस्थांच्या सदर बाब लक्षात आल्याने लगेच त्यांनी मिळेल तेथील पाणी आणून आगीवर टाकले, तर काहींनी टोपल्यांनी माती आणून आग नियंत्रणात आणली. ग्रामस्थांच्या आटोकाट प्रयत्नामुळे आग पसरु न शकल्यामुळे इतर नुकसान झाले नाही. जाधव यांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये घरात ठेवलेले हळदीचे पोते, रोख २० हजार रुपये, संसारोपयोगी सामान, शेतीपयोगी अवजारे जळून खाक झाले आहेत. सदर माहिती मिळताच जि.प. सदस्य राजेश मापारी यांनी जाधव कुटुंबीयांना भेट दिली.

Web Title: Fire at home in Nizampur