सूतगिरणीच्या फिल्टरला आग; दीड लाखांची हानी

By Admin | Updated: December 14, 2015 02:25 IST2015-12-14T02:25:16+5:302015-12-14T02:25:16+5:30

जळगाव जामोद येथील घटना.

Fire to the filtrate filter; Loss of one and a half lakhs | सूतगिरणीच्या फिल्टरला आग; दीड लाखांची हानी

सूतगिरणीच्या फिल्टरला आग; दीड लाखांची हानी

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : स्थानिक संजय गांधी सूतगिरणीच्या फिल्टर रूममध्ये १२ डिसेंबरला रात्री स्पार्किंगमुळे आग लागून जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत वेस्ट कापूस जळाला असल्याचे तेथे कार्यरत कर्मचार्‍यांनी सांगितले. दरम्यान, सूतगिरणीतील कर्मचार्‍यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली. जळगाव जामोद येथील सूतगिरणीचे दैनंदिन कामकाज सुरू असताना शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास फिल्टर रूममध्ये मशीनच्या स्पार्किंंगमुळे ठिणगी उडाली आणि रूममध्ये असलेल्या वेस्ट रुईने पेट घेतला. प्रारंभी ही बाब लक्षात आली नाही; मात्र ही बाब लक्षात येताच कार्यरत कर्मचारी व सूतगिरणीचे संचालक अजिंक्य टापरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी त्वरेने प्रयत्न सुरू केले. त्यामुळे अवघ्या अध्र्या तासात ही आग आटोक्यात आली. त्यानंतर सूतगिरणीच्या नियमित कामास प्रारंभ झाला. दरम्यान, रविवारी सकाळी सूतगिरणीच्या अध्यक्ष अंजली टापरे यांनी घडलेल्या प्रकाराची पाहणी केली आणि कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखवत ही आग वेळीच आटोक्यात आणल्याबद्दल तंना शाबासकीही दिली. सू तगिरणीमधील यंत्र हे रात्रंदिवस सतत कार्यरत राहत असल्याने कधी-कधी असा अनर्थ घडतो, असे कर्मचार्‍यांनी सांगितले. त्याकरित येथील अग्निरोधक यंत्रणा सदैव सज्ज असते, असे सांगण्यात आले. सध्या सूतगिरणीचे काम सुरळीत असून, परिसरातील बेरोजगारांना अधिकाधिक रोजगार कसा देता येईल, या दृष्टीने सध्या संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Fire to the filtrate filter; Loss of one and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.