टुणकी येथील गादी कारखान्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 13:49 IST2017-04-15T13:49:08+5:302017-04-15T13:49:08+5:30
संग्रामपूर तालुक्यातील टुणकी येथील गादी कारखान्याला शनिवारी आग लागली. नाजीम सौदागर मालकीच्या गादी कारखाना आहे.

टुणकी येथील गादी कारखान्याला आग
वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील टुणकी येथील गादी कारखान्याला शनिवारी आग लागली. नाजीम सौदागर मालकीच्या गादी कारखाना आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे गादी कारखान्याची राख-रांगोळी झाली असून सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. शे.रेहान नाजीम सौदागर असे जखमी मुलाचे नाव असून, त्याला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.