गादी कारखान्याला आग
By Admin | Updated: February 17, 2015 01:21 IST2015-02-17T01:21:59+5:302015-02-17T01:21:59+5:30
सिंदखेड तालुक्यातील साखरखेर्डा येथे शॉर्टसर्कीटमुळे गादी कारखान्याला आग, दिड लाखाचे नुकसान.
गादी कारखान्याला आग
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील साखरखेर्डा येथे शॉर्टसर्कीटमुळे गादी कारखान्याला आग लागून १ लाख ५0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, साखरखेर्डा येथील राजू पठाण यांच्या गादी कारखान्यामधून धूर निघत असल्याचे एकबाल खान अय्युब खान यांना दिसले. त्यांनी आरडाओरड करुन इतर लोकांना मदतीसाठी बोलावले. तोपर्यंत कारखान्यातील रुईने पेट घेऊन गादीघर आगीच्या विळख्यात सापडले. आग वाढत जाऊन कारखान्यातील मशिनही जळाली. दरम्यान एका टँकरने आग विझविण्यास मदत केली. तर शे.अयुब सै.जाहेद, सै.अकबर यांनी शुक्रवार तलावातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या आगीने कारखान्यातील रुई, गाद्या, कपडे, विद्युत साहित्य व इतर उपकरणे जळून खाक झाल्याने राजू पठाण यांचे १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.