ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा आग
By Admin | Updated: December 24, 2015 02:38 IST2015-12-24T02:38:53+5:302015-12-24T02:38:53+5:30
महिन्यातील दुसरी घटना.

ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा आग
खामगाव : फायरलाइनच्या कामादरम्यान ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये २३ डिसेंबरला सकाळी पुन्हा आगीचा भडका उडला. त्यामुळे देव्हारीनजीकच्या टेकडीपर्यंंत ही आग पसरली होती. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आगीमुळे मोठे नुकसान होत असते. त्या पार्श्वभूमीवर अभयारण्यातंर्गत जवळपास ७४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा कंट्रोल बर्नींग करण्यात येत आहे. ५00 रुपये प्रती किलोमीटर प्रमाणे प्रारंभी रस्त्याच्या लगतच्या दहा फुटापर्यंंतचे गवत गेल्या महिन्यात कापण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कंट्रोल बर्निंंगद्वारे हे गवत जाळून टाकण्यात येत आहे. या मार्गावरून जाणार्या वाटसरूकडून चूकून आगीची ठिणगी पडून जंगलात वनवा लागून नये, या दृष्टीकोणातून फायरलाईन क्षेत्रात हे कंट्रोल बर्निंंग करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणेच ही कामे यावर्षी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसापूर्वीही अभयारण्यातंर्गत देव्हीरीनजीकच्या परिसरात आग लागून मोठे नुकसान झाले होते. २३ डिसेंबर रोजी कंट्रोल बर्निंंगचे काम सुरू असताना आगीचा भडका उडाला आणि लगतच्या टेकडी परिसराकडे ही आग लागली. मात्र कंट्रोल बर्निंंगसाठी कार्यरत असलेल्या वन्यजीव विभागाच्या २५ मजुरांनी ही आग जवळपास अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली.