शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

धाड येथे अग्नितांडव; सहा दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:32 IST

साधारण चार तासापेक्षा जास्त अधिक वेळ ही आग धगधगत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : स्थानिक बसस्टँडनजीकच्या एका भंगारच्या दुकानास अचानक आग लागल्याची घटना २८ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. या आगीचा सहा दुकानांना फटका बसला असून, तीन दुकाने जळुन खाक झाली आहेत. साधारण चार तासापेक्षा जास्त अधिक वेळ ही आग धगधगत होती. यामध्ये जवळपास ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले.स्थानिक बसस्टँड लगत अनेक छोटी मोठी दुकाने आहेत. त्यामध्ये शे. फीरोज शे फत्तु (रा.पारध) यांचे भंगार खरेदीचे मोठे दुकान आहे. त्यांच्या दुकानाला गुरूवारी सकाळी मागील बाजूस अचानक आग लागली. आग लागताच पोलिसांनी धाव घेतली मात्र आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग वाढतच गेली. गावातील खासगी टँकरधारक रमेश घाडगे, गजानन देशमुख, सतीष जाधव, शे.अजिम शे.मजिद, शे. आसिफ यांनी तात्काळ आपले टँकर घटनास्थळी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परिसरातील शांताराम शिरसाट, शे.नदिम शे.अलिम यांनी घरच्या बोअरचे पाणी उपलब्ध करून दिले. परंतू आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याने ती आटोक्यात आणणे अवघड झाले होते.ग्रामपंचायत, महसूल विभागाच्या लोकांनी धरणातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून घटनास्थळी पाणी आणले. आग लागल्या नंतर दोन तासांनी बुलडाणा नगर परिषद, चिखली नगर परिषद आणि जाफराबाद नगर परिषद वतीने अग्नीश्यामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. मात्र आगीचे रौद्र रूप पाहता ह्या वाहनातील पाणी संपल्यावर एका वाहनात धरणातुन येणारे पाणी सोडले. तर दुसऱ्या वाहनात गावालगतच्या विहीरीतुन पाणी भरल्या गेले. साधारण चार तासाने ही आग आटोक्यात आली. मात्र लगतच्या नामदेव मोहिते यांच्या हॉटेल आणि लॉजिंग, नंदकिशोर सोनवने यांचे बांबूचे दुकान आगिच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांचेही नुकसान झाले. महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी ए. एन. शेळके, तलाठी प्रभाकर गवळी, कोतवाल बापू तोटे ह्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ठाणेदार दिनेश झांबरे, पोलीस चमू यावेळी उपस्थित होती. असे झाले नुकसानआगीमुळे एकुण ४५ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भंगार दुकानाचे २० लाख ८० हजार रुपये, तर हॉटेल लाँजिंग सात लाख ४५ हजार रुपये व बांबूच्या दुकानाचे चार लाख, पेंन्टरच्या दुकानाचे ८६ हजार रुपये, हाडर्वेअरचे ३ लाख १८ हजार रुपये, अ‍ॅटोपार्ट व संगणक सेंटरचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग