अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:28+5:302021-03-04T05:05:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात असलेल्या मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने भरण्यात ...

Fire department's cart on untrained employees! | अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा!

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा!

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात असलेल्या मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा चालविण्यात येत आहे. भरती करण्यात आलेल्या १४ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत.

बुलडाणा नगरपरिषद हद्दसह इतर ठिकाणी आग लागल्यास धावून जाणाऱ्या नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात गत अनेक वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. बुलडाणा येथील अग्निशमन विभागाकडे केवळ तीन कर्मचारी आहेत. या तीन कर्मचाऱ्यांसह १४ सेवार्थी (कंत्राटवर) काम करताहेत. यांपैकी आठजणांना काेणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना त्यांच्या भरवशावर कार्यरत तीन कर्मचारी यांच्याकडून कार्य करून घेत आहेत. विशेष म्हणजे चार फायरमन पदांपैकी केवळ एकच फायरमन आहे. अशावेळी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आगीच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे रिक्त पदांमुळे अग्निशमन विभागावर ताण वाढत आहे. चिखली शहरापर्यंत आग विझविण्यासाठी बुलडाणा नगर पालिकेचा बंब जाताे.

केवळ सहा कर्मचारीच प्रशिक्षित

nबुलडाणा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागात एकूण १४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

nकंत्राटी पद्धतीने सेवार्थी मजूर असून, यांना काेणत्याच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. ते अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार कार्य करताहेत.

n१४ पैकी ६ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. तसेच ८ कर्मचाऱ्यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बुलडाणा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचा गाडा सुरू आहे. वाढत्याच्या आगीच्या घटना पाहता रिक्त पदे भरण्याची मागणी हाेत आहे.

काेराेना काळातही केली सेवा

n नगर पालिकेच्या अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी काेराेनाच्या काळातही सेवा बजावली आहे.

nबुलडाणा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही अग्निशमन दल पाेहोचून आगीवर नियंत्रण मिळवते.

बुलडाणा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील रिक्त पदांविषयी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

- स्वप्निल लघाने, उपमुख्याधिकारी, न. प. बुलडाणा

Web Title: Fire department's cart on untrained employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.