फर्निचरच्या दुकानाला आग लागून नुकसान
By Admin | Updated: March 3, 2017 00:36 IST2017-03-03T00:29:55+5:302017-03-03T00:36:41+5:30
शहरातील लक्कडगंज भागात असलेल्या फर्निचरच्या दुकानाला बुधवारी रात्रीदरम्यान आग लागल्याची घटना घडली. साहित्य जळून अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.

फर्निचरच्या दुकानाला आग लागून नुकसान
खामगाव, दि.२ - शहरातील लक्कडगंज भागात असलेल्या फर्निचरच्या दुकानाला बुधवारी रात्रीदरम्यान आग लागल्याची घटना घडली. यात दुकानातील लाकूड, फर्निचरसह साहित्य जळून अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. मोहम्मद साबीर अ.वहक (वय ४२) रा.लक्कडगंज यांच्या फर्निचर दुकानाला बुधवारी रात्री दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुकानात जास्त प्रमाणात लाकडी साहित्य असल्याने आग जलद गतीने पसरली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने नगर परिषद अग्निशमन दलास पाचारण करून आग विझविण्यात आली. यात दुकानातील सागवान लाकडाचे फर्निचर साहित्य, मशनरी आदी जळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे मो. साबीर यांनी सांगितले.