मेहकर तहसीलमधील कॅन्टीनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:19+5:302021-02-05T08:31:19+5:30
शनिवारी दुपारी ही आग लागली. तहसील कार्यालयाला सुटी असल्ल्याने ही आग अगोदर कोणाच्या निदर्शनास आली नाही. दरम्यान, या आगीने ...

मेहकर तहसीलमधील कॅन्टीनला आग
शनिवारी दुपारी ही आग लागली. तहसील कार्यालयाला सुटी असल्ल्याने ही आग अगोदर कोणाच्या निदर्शनास आली नाही. दरम्यान, या आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र वेळीच ही आग स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सोबतच कॅन्टीनमधील दोन गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढण्यात आले, अन्यथा आगीची व्याप्ती वाढली असती. दत्ता गिरी यांच्या मालकीचे हे कॅन्टीन आहे. आगीची माहिती त्वरित अग्निशामक दलाला देण्यात आली. पोलिस व अग्निशामक दल त्वरित घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे गजानन कुल्लाळ, मानवतकर, विशाल शिरपूरकर, पोलिस विभागाचे श्रीराम निळे, अशोक म्हस्के, कोरडे व संदीप सास्ते, चंदू गवळी, नूर गवळी, सय्यद हारुण, संतोष मालोसे, मुजीब शेख, सागर कानोडजे, सचिन देशमुख, मंगेश देशमुख, जगन देशमुख व सहकाऱ्यांनी ही आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
(फोटो)