आगीत ऊस जळून खाक

By Admin | Updated: April 10, 2015 02:29 IST2015-04-10T02:29:35+5:302015-04-10T02:29:35+5:30

धाड परिसरात शेतात दिड एकरावरील उसाला आग.

Fire burns sugarcane | आगीत ऊस जळून खाक

आगीत ऊस जळून खाक

धाड : येथील शेतकरी म. अकील म. खलील यांच्या शेतातील दीड एकरावरील उसाला अचानक आग लागली. त्यामध्ये ऊस जळून खाक झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. आगीत म. अकील यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. धाड येथील शेतकरी म. अकील यांच्या गट नं.३८४ मधील शेतात 0.६0 आर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. पिकाने पक्व अवस्था गाठली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उसाचे पाचट वाळल्याने ८ ए िप्रल रोजी सायंकाळी अचानक या उभ्या पिकास आग लागली. बघता बघता आगीने रौद्र स्वरूप धारण केले. यावेळी संबंधित शेतमालक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु तोवर संपूर्ण पीक आगीचे भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेत त्यांचा दीड एकरवरील ऊस भस्मसात झाला. या घटनेची माहिती प्राप्त होताच तलाठी धनंजय शेवाळे, तलाठी किशोर कानडजे, बापू तोटे, विनोद खंडारे, म. जफर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उसाला आग लागून म. अकील यांचे सुमारे ७0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकर्‍यास शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Fire burns sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.