मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 01:06 PM2022-03-31T13:06:56+5:302022-03-31T13:07:05+5:30

Fire at sub-divisional officer's office in Mehkar : महसूल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत.

Fire at sub-divisional officer's office in Mehkar; Burn the document | मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक

मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक

Next

मेहकर: येथील उपविभागाीय अधिकारी कार्यालयाला आग लागल्याची घटना ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या आगीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत.
मेहकर येथील तहसील कार्यालय परिसरातच उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे. या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. उपविभागीय अधिकारी कार्यलयाला लागून पाठी मागील भागात महसूल कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. कार्यालयातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच सर्वत्र धावाधाव सुरू झाली. दरम्यान, नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलावण्यात आले. बराच वेळ आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतू तोपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयासह महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील अनेक महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत. यामध्ये निवडणूक विभागातील ५४ ग्रामपंचायतच्या निवडणूक जवळ आल्याने अपडेट असलेले रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Fire at sub-divisional officer's office in Mehkar; Burn the document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.