अंबिका अर्बन पतसंस्थेत आग; कागदपत्रांसह साहित्य खाक

By Admin | Updated: April 14, 2017 23:12 IST2017-04-14T23:12:06+5:302017-04-14T23:12:06+5:30

बुलडाणा- जिजामाता प्रेक्षागारमधील अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेच्या कार्यालयाला शुक्रवारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Fire in Ambika Urban Credit Society; Documents with documentation | अंबिका अर्बन पतसंस्थेत आग; कागदपत्रांसह साहित्य खाक

अंबिका अर्बन पतसंस्थेत आग; कागदपत्रांसह साहित्य खाक

चोरट्यांनी सीसी कॅमेऱ्यांची तार कापण्याच्या प्रयत्नात आग

बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारमधील अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. कार्यालयात चोरट्यांनी चोरी करण्याकरिता सीसी कॅमेऱ्याची तार कापण्याचा प्रयत्न करीत असताना ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येथील जिजामाता प्रेक्षागारमध्ये अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी रात्री काही चोरटे शिरले. चोरी करण्याकरिता त्यांनी आधी सीसी कॅमेऱ्यांची तार कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत कार्यालयातील दोन एसी, संगणक, खुर्च्या व महत्त्वाचे कागदपत्रे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आर.ओ. यंत्र विक्रीच्या दुकानात चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. सदर चोरट्यांनीच अंबिका अर्बनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना सदर आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: Fire in Ambika Urban Credit Society; Documents with documentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.