शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीचे लग्‍न मोडून फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 15:03 IST

खामगाव शहरातील अरुणोदय नगर भागातील एका तरुणाच्या बहिणीचे लग्‍न मोडून समाजात बदनामी केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 बुलडाणा - खामगाव शहरातील अरुणोदय नगर भागातील एका तरुणाच्या बहिणीचे लग्‍न मोडून समाजात बदनामी केल्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी  मंगळवारी केली. या कारवाईमुळे पुणे येथील होले कुटूंबियांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

        शहरातील अरुणोदय नगर जलंब रोड भागातील एका तरुणाच्या बहिणाच्या विवाहाचा योग हरणखेड येथील अमित रामदास होले ह.मु.पुणे यांच्याशी ठरला होता. हा संबंध जुळवितांना हरणखेड येथील मनोज रामदास होले, रामदास हरी होले ह.मु.पुणे, गजानन जगन्नाथ कोल्हे रा. मलकापूर, श्रीकृष्ण जगन्नाथ कोल्हे रा. मलकापूर, प्रमोद रविंद्र भोळे रा. उत्‍तर प्रदेश,  कल्पना प्रमोद भोळे रा.उत्‍तर प्रदेश व आर.के. पाटील रा. अकोला यांच्या संमतीने विवाह संबंध जुळुन आला होता. त्यानुसार २८ जून २०१८ रोजी विवाह करण्याचे ठरले होेते. मात्र मध्यतंरीच्या काळात आठही जणांनी संगनमत करुन संबंधित तरुण व त्यांच्या परिवाराशी कोणताही संपर्क न करता विवाह मोडला. दरम्यान बहिणीच्या लग्‍नाची पूर्व तयारी म्हणून संबंधित तरुणाने मंगल कार्यालय, फोटो ग्राफर, आचारी आणि तत्सम बाबीची पूर्तता केली होती. याबाबत होले कुटुंबीयांनाही सूचना देण्यात आली होती. मात्र होले कुटुंबीयांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित तरुणाने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी उपरोक्‍त आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४१८,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय तावडे करीत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्नnewsबातम्याbuldhanaबुलडाणा