तढेगाव अपघातामधील मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:47+5:302021-08-26T04:36:47+5:30
प्रारंभी कंत्राटदार कंपनीने या मजुरांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली नसल्यामुळे रोष व्यक्त होत होता. त्यासंदर्भाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रकचर कंपनीचे या ...

तढेगाव अपघातामधील मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत
प्रारंभी कंत्राटदार कंपनीने या मजुरांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली नसल्यामुळे रोष व्यक्त होत होता. त्यासंदर्भाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रकचर कंपनीचे या कामाचे प्रोजेक्ट मॅनेजर धरमबीर पांडे यांच्याशी संपर्क असता असता मृत व्यक्तीच्या कुटुंबांला प्रत्येकी पाच लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात येत येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच मध्य प्रदेश सरकारनेही मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. परिणामी यासंदर्भात सिंदखेड राजा परिसरात सुरू असलेल्या काही उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
--विम्याचीही रक्कम मिळणार--
या मजुरांचा विमाही काढण्यात आलेला होता. त्यासंदर्भातील कागदपत्रे तथा मृत्यू प्रमाणपत्र व अन्य काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर त्याची रक्कमही या मृताच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. दरम्यान ही मदत प्रत्यक्ष मृताच्या कुटुंबीयांच्या हातात पडण्यास काहीसा विलंब लागण्याची शक्यताही पांडे यांनी व्यक्त केली.