अखेर खामगाव नगर पालिकेतील मोजमाप पुस्तिका सापडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:46 IST2021-07-01T11:46:28+5:302021-07-01T11:46:33+5:30
Khamgaon Municipal counsil : बरीच शोधाशोध केल्यानंतर बांधकाम विभागाला मोजमाप पुस्तिकेचा शोध लागला.

अखेर खामगाव नगर पालिकेतील मोजमाप पुस्तिका सापडली!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पालिकेतील गहाळ झालेली मोजमाप पुस्तिका अखेर सापडली आहे. बरीच शोधाशोध केल्यानंतर बांधकाम विभागाला मोजमाप पुस्तिकेचा शोध लागला.
यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर गहाळ मोजमाप पुस्तिका सापडली आहे.
सिमेंटरस्त्याची अनामत रक्कम काढण्यासाठी खोटे दस्तवेज तयार करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर गत आठवड्यात ही मोजमाप पुस्तिका गहाळ झाली होती. आठ-दहा दिवस शोध घेतल्यानंतरही ही मोजमाप पुस्तिका सापडली नव्हती. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना धारेवर धरले होते.