शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बुलडाणा जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये लाॅकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 16:54 IST

Lockdown in Buldhana बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर नगर पालिका क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून घाेषीत करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे२२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते १ मार्चपर्यंत लाॅकडाउन करण्यात आले आहे.जीवनाश्यक वस्तुंची दुकाने ही केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बुलडाणा: जिल्ह्यात काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच शहरांमध्ये २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते १ मार्चपर्यंत लाॅकडाउन करण्यात आले आहे.  बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर नगर पालिका क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून घाेषीत करण्यात आले आहेत. या पाच शहरांमध्ये जीवनाश्यक वस्तुंची दुकाने ही केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्ण वाढत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी ३०० पेक्षा जास्त काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण निघाले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लाॅकडाऊनच्या निर्देशांचीच घाेषणा केली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी बुलडाणा, चिखली, देउळगाव राजा, खामगाव आणि मलकापूर प्रतिबंधात्मक  शहरे घाेषित केले आहेत.या शहरांमध्ये २२ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६ वाजतापासून लाॅकडाऊनचे आदेश देण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ जीवनाश्यक वस्तुंची दुकाने ही केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMalkapurमलकापूरChikhliचिखलीDeulgaon Rajaदेऊळगाव राजा