शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘समृद्धी’ पिंपळखुटा खासगी बस अपघातप्रकरणी सोमवार पर्यंत अंतिम अहवाल

By निलेश जोशी | Updated: July 6, 2023 20:11 IST

१ जुलै रोजी बस अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी पहाटे खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन त्यात २५ जणांचा जळून मृत्यू झाल्याप्रकरणी सोमवार पर्यंत परिवहन आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. प्राथमिक अहवालानुसार अपघातादरम्यान बस प्रथम रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या स्टीलच्या पोलला धडकली. तेथून पुढे १० ते १५ फुटावर असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकली. यावेळी चालकाने अशा स्थितीत नैसर्गिक सवयीप्रमाणे चालकाने बस डाव्या बाजूला घेतील. त्यावेळी बसचे समोरील चाक आणि मागील चाक (रेअर व्हील) ही कठड्याला धडकले.

याच दरम्यान बसचा फ्रन्ट ॲक्सल तुटून डिझेल टाकीवर धडकला. त्यातील सुमारे ३०० ते ३५० लीटर डिझेल क्रॉप्रेस होऊन डिझेल टाकील मागील बाजून फुटून डिझेल खाली सांडले. याच दरम्यान बस उलटली सोबतच ॲक्लसविना ती घासत गेल्याने जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झाली सोबतच इंजिन ऑलईही खाली सांडले. ते गरम असल्याने डिझेल व ऑईलचा संपर्क येऊन आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज प्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे. दरम्यान चालकाला रस्ते संमोहन, डुलकीमुळे बस प्रथम पोलला धडकल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रासद गाजरे यांनी सांगितले. प्राथमिक अहवाल पुर्वी परिवहन आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे. अंतिम अहवालही आगामी दोन ते तीन दिवसात किंवा सोमवारपर्यंत पाठविला जाईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी स्पष्ट केले.

अपघातापूर्वी १५२ किमीचा प्रवासअपघात होण्यापूर्वी बसन कारंजा येथून समृद्धी महामार्गावर आली होती. तेथे बसचा निश्चित असा ११ वाजून ८ मिनीटाचा वेळ नोंदवला गेला आहे. तेथून १५२ किमी पुढे आल्यानंतर पिंपळखुटा गावानजीक हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसचा वेग हा साधारणत: ७० किमीच्या आसपास होता. त्यावरून कारंजा ते पिंपळखुटा हे अंतर कापण्यासाठी बसला २ तास २४ मिनीटे लागली. त्यामुळे बस अधिक वेगात होती असे म्हणता येत नसल्याचे परिवहन आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

आपतकालीन दरवाजा झाला निष्क्रीयपोल व पुलाचा कठड्याला बस धडकून डाव्या बाजून उलटली. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असलेली मार्गिका पुर्णपणे बंद झाली व बसच्या उलटल्यामुळे पूर्ण बसच्या बॉडीचे संतुलन बिघडले व आपतकालीन दरवाजा निष्क्रीय झाल्याचेही अनुषंगीक प्राथमिक अहवालात म्हंटले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातDeathमृत्यूRto officeआरटीओ ऑफीस