सावकारीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: February 6, 2015 02:08 IST2015-02-06T02:08:36+5:302015-02-06T02:08:36+5:30
खामगाव तालुक्यातील प्रकरण.

सावकारीचा गुन्हा दाखल
खामगाव : सावकारी प्रकरणी तामगाव पोलिसांनी आज ५ फेब्रुवारी एकाविरुध्द सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रल्हाद जयराम डाबरे (वय ५२) यांनी एका सावकाराजवळून १ लाख रुपये ६ टक्के व्याजदराने घेतले होते. तर या मोबदल्यात दोन कोरे धनादेश सावकाराकडे दिले होते. तर या कर्जाची परतफेड म्हणून प्रल्हाद डाबरे यांनी १ लाख ७२ हजार रुपये सावकाराला परत दिले होते. दरम्यान याबाबत उपरोक्त आशयाची फिर्याद आज प्रल्हाद डाबरे यांनी खामगाव पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी खामगाव येथील डॉ. अशोक गोपीकीशन टावरी यांच्याविरूद्ध महाराष्ट्र साहुकारी अधिनियम कलम ३९, ४२, ४४, ४५ (क) व ५0६ भादंवि नुसार सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.