युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसने केली राष्ट्रपतींकडे मागणीमोताळा : मध्यप्रदेश सरकारने गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या घडविलीअसल्यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बुलडाणायुवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आलीआहे.सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतकऱ्याला अनेक अडचणीचा सामना करावालागत आहे. कर्जमुक्तीसाठी मध्यप्रदेशात आंदोलन करित असणाऱ्या शेतकऱ्यांवरअमानुष गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ६ शेतकरी गतप्राण झाले. यागंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेस व मोताळातालुका काँग्रेसकडून मोताळा बसस्थानक चौकात मेणबत्ती लावून श्रध्दांजलीदेण्यात आली.त्यानंतर युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसकडून मोताळा तहसिलदारांमार्फतराष्ट्रपती यांना निवेदन देवून मध्य प्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचागुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदनावर मोताळा तालुकाअध्यक्ष अनिल खाकरे, काँग्रेस नेते एकनाथ खर्चे, युवक काँग्रेसचे इरफानपठाण, विजयसिंग राजपूत, जि.प.सदस्य, महिंद्रा गवई, राजेश गवई, मिलिंदअहिरे, ताराबाई शिंबरे, उर्मिला अवचार, निर्मला राठे, अनंत देशमुख,विक्रम देशमुख यांच्यासह निवेदनावर अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.(प्रतिनिधी)
मध्यप्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By admin | Updated: June 8, 2017 15:33 IST