रेमेडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:59+5:302021-04-26T04:31:59+5:30

बुलडाणा : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ या संधीचा लाभ घेत काही जण जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत ...

File charges against those who blackmailed Remedesivir | रेमेडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

रेमेडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

बुलडाणा : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ या संधीचा लाभ घेत काही जण जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत़ इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांनीि दिले़ तसेच जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. तरी या रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करून घ्यावे. जे खाजगी कोविड रुग्णालय आठ दिवसात फायर ऑडिट पूर्ण करून घेणार नाही, अशा खासगी कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द करावी, असे आदेशही त्यांनी दिले़

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एस़ रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, उपजिल्हाधिकारी अहिरे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय स्तरावर खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद येथे मान्यता देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती युद्धपातळीवर करण्यात यावी. तसेच खासगी व शासकीय रुग्णालयाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्यासंदर्भात वेळेवर मागणी न करता यासंदर्भात प्रत्येक तहसील स्तरावर एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडून अगोदरच आढावा घेऊन मागणी नोंदवावी, असे आदेशही पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्यात काही लोक रेमेडेसिविरची काळाबाजारी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खासगी रुग्णालयात रुग्णांना रेमेडेसिविर इंजेक्शन दिल्यावर खाली झालेल्या बॉटलवर त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे वेळोवेळी ऑडिट करावे. जे रुग्णालय याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी देखील रेमेडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशा सूचनादेखील पालकमंत्री डॉ़ शिंगणे यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी लसीकरणाचा, स्वॅब तपासणी अहवाल व लाॅकडाऊनचादेखील आढावा घेतला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण फार गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले़

Web Title: File charges against those who blackmailed Remedesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.