वसीम रिजवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST2021-03-18T04:34:21+5:302021-03-18T04:34:21+5:30

मेहकर : मुस्लीम समाजाचा पवित्र ग्रंथ कुराणबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य केले. ...

File a case against Wasim Rizvi - A | वसीम रिजवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा - A

वसीम रिजवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा - A

मेहकर : मुस्लीम समाजाचा पवित्र ग्रंथ कुराणबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य केले. त्यामुळे मुस्लीम धर्मामध्ये विनाकारण अपप्रचार होत असून संपूर्ण भारतात जातीय तणाव निर्माण होण्याचा व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वसीम रिजवी यांनी केलेला आहे. तेव्हा वसीम रिजवी यांनी केलेल्या गंभीर कृत्याबद्दल त्यांच्यावर कडक पोलीस कार्यवाही करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी बुलडणा जिल्हा मुस्लीम कोअर कमिटी शाखा मेहकरच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या वेळी शेख सलमान शेख शमीम, अश्फाक शाह अफरोज शाह, अजगर टेलर, मशीन खान, शेख आरिफ खान पठाण, बशीर कुरेशी, मुस्ताक पठाण शेख, इरफान अब्दुल जब्बर यांची उपस्थिती होती.

Web Title: File a case against Wasim Rizvi - A