कव्हाळा येथे दाेन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:08+5:302021-03-04T05:05:08+5:30

अमडापूर : येथून जवळच असलेल्या कव्हाळा येथे दोन गटांत किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना २८ फेब्रुवारी राेजी घडली ...

Fighting in Daen groups at Kavhala | कव्हाळा येथे दाेन गटांत हाणामारी

कव्हाळा येथे दाेन गटांत हाणामारी

अमडापूर : येथून जवळच असलेल्या कव्हाळा येथे दोन गटांत किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना २८ फेब्रुवारी राेजी घडली आहे. या प्रकरणी दाेन्ही गटांच्या परस्परविराेधी तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सुनील दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी दत्ता भगवान चौधरी याने २८ फेब्रुवारी माझ्या वडिलांस शिवीगाळ सुरू केली. मी त्याला हटकण्यास गेलो असता, त्याने मला लोटपाट केली, तसेच आरोपी प्रीती बालाजी जाधव, ज्योती दत्ता चौधरी यांनी माझे डोक्यावर दगड मारून जखमी केले. या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी दत्ता भगवान चौधरी, प्रीती बालाजी जाधव, ज्योती दत्ता चौधरी यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटाच्या दत्तात्रय भगवान चौधरी यांनी तक्रार दिली की, आरोपी बालाजी दिलीप जाधव, सुनील दिलीप जाधव या कव्हळा यांनी, तू माझ्या घरासमोर का आलास, असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ व लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दाेन्ही आराेपींविरुद्ध भादंवि कलम २९४, ३२३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय टेकाळे, पोकाॅ. वैद्य हे करीत आहेत.

Web Title: Fighting in Daen groups at Kavhala