क्षुल्लक कारणावरून दाेन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST2021-08-12T04:38:54+5:302021-08-12T04:38:54+5:30

८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोताळा येथील पंकज गजानन पाटील हे मित्र सोपान लवंगे, अंकुश वाघ आणी ...

Fighting in the Daen group for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून दाेन गटात हाणामारी

क्षुल्लक कारणावरून दाेन गटात हाणामारी

८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोताळा येथील पंकज गजानन पाटील हे मित्र सोपान लवंगे, अंकुश वाघ आणी वसीम शाह यांच्यासमवेत मलकापूर मार्गावरील श्रीनाथ ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा शेवभाजीवरून वाद झाला. यामध्ये त्यांना तिघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंकज गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी डिडोळा येथील पप्पू श्रीनाथ, मयूर श्रीनाथ आणी अशोक श्रीनाथ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातील डिडोळा येथील अशोक मोतीराम श्रीनाथ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पंकज पाटील व स्वप्नील लवंगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे हे करीत आहेत.

Web Title: Fighting in the Daen group for trivial reasons