काट्याची लढत
By Admin | Updated: October 16, 2014 00:32 IST2014-10-16T00:32:29+5:302014-10-16T00:32:29+5:30
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान.

काट्याची लढत
जळगाव जामोद (बुलडाणा): विधानसभा निवडणुकीसाठी आज जळगाव जामोद म तदारसंघात ६५ ते ७0 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५ वाजे पर्यंत ५७.१२ टक्के मतदान झाले. अंतिम मतदानाची टक्केवारी ६५ ते ७0 टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे. जळगाव मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली. मतदारसंघातील सुमारे १५ मतदान केंद्रांवर शेवटच्या तासात मतदारांचा ओघ वाढल्याने सहा नंतरही म तदानाची प्रक्रिया सुरू होती, असे निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे यांनी सांगि तले.
आज सकाळी अत्यंत धिम्यागतीने मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात आठ टक्के, दुसर्या दोन तासात १३ टक्के, तिसर्या दोन तासात फक्त ९ टक्के तर चौथ्या दोन तासात १६.५0 टक्के आणि पाचव्या दोन तासांनी ११ टक्के मतदान झाले. असे एकूण ५ वाजेपर्यंत ५७.१२ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सुमारे ७0 टक्के म तदान होण्याची शक्यता आहे.
संग्रामपूर तालुक्यातील कवठळ तसेच एकलारा बानोदा येथे मतदानाच्या ६ वाजता या वेळेपूर्वी शेकडो मतदार मतदानासाठी आले. त्यामुळे गेट करुन या मतदारांच्या मतदान प्रक्रिया सायंकाळी ७.३0 वाजेपर्यंत सुरु होती.
जळगाव मतदारसंघ
एकूण मतदान २,६२,३७७
महिला १,२३,१८८
पुरुष १,३९,१८६
मतदान केंद्र २७0