भावामध्ये हाणामारी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST2021-09-02T05:13:52+5:302021-09-02T05:13:52+5:30

ग्रामसेवकास मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा मोताळा : तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार येथे विवाह नोंदणीच्या कारणावरून ग्रामसेवकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी ...

Fighting between brothers, filing a crime | भावामध्ये हाणामारी, गुन्हा दाखल

भावामध्ये हाणामारी, गुन्हा दाखल

ग्रामसेवकास मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा

मोताळा : तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार येथे विवाह नोंदणीच्या कारणावरून ग्रामसेवकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून सरपंचासह दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोऱ्हाळा बाजार येथे मंगळवारी मासिक सभा होती. त्यावेळी ग्रामसेवक सुरेश जाधव आणि सरपंच श्रीकृष्ण सोनोने यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र वरून वाद झाला. तर गजानन गोराडे यांनी ग्रामसेवकास मारहाण केली. त्यामुळे दोघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद धामणगाव बढे पोलिसांत ग्रामसेवक सुरेश जाधव यांनी दिली आहे.

विषारी औषध पोटात गेल्याने चिमुकली गंभीर

बुलडाणा : विषारी औषध पोटात गेल्याने चार वर्षीय चिमुकलीला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. पूर्वी राहुल कुळकर्णी (रा. हतेडी बु.) असे या चिमुकलीचे नाव आहे. पूर्वीला ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागले होते.सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Fighting between brothers, filing a crime