१९ मध्ये १७ तर १८३ ग्रामपंचायतींमध्ये ७ जागांसाठी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:35+5:302020-12-30T04:43:35+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील ८७० पैकी ५२७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी राेजी हाेणार आहे. यामध्ये १७ सदस्य असलेल्या ...

१९ मध्ये १७ तर १८३ ग्रामपंचायतींमध्ये ७ जागांसाठी लढत
बुलडाणा : जिल्ह्यातील ८७० पैकी ५२७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी राेजी हाेणार आहे. यामध्ये १७ सदस्य असलेल्या तब्बल १९ तर सात सदस्य संख्या असलेल्या १८३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी राेजी हाेणार आहे. यामध्ये सर्वांत माेठ्या ग्रामपंचायती १७ सदस्यांच्या असून, लहान ग्रा.पं.मध्ये ७ सदस्य आहेत. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये देऊळगाव मही, लाखनवाडा बु., सुटाळा बु., चांडाेळ, देऊळघाट, धाड सागवन, पिंपळगाव काळे, आसलगाव, साेनाळा, अमडापूर, माटरगाव बु., दुसरबीड, साखरखेर्डा, वडनेर भाेलजी, चांदूर बिस्वा, धामणगाव बढे, राेहीनखेड, डाेणगाव आदी गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गुलाबी थंडीत वातावरण तापत आहे. गावागावांत काेण बाजी मारणार याविषयी चर्चा रंगत आहेत. या वेळी सातवी पासची अट असल्याने अंगठे बहाद्दर निवडणुकीतून हद्दपार झाले आहेत. तसेच निवडणूक विभागाने स्वतंत्र बँक खाते काढण्यास सांगितल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. तीन दिवस सुट्या आल्याने उर्वरित दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाभरात तहसील कार्यालयांमध्ये गर्दी हाेणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.