झाडेगाव चौफुलीवर भीषण अपघात
By Admin | Updated: May 15, 2014 00:07 IST2014-05-15T00:06:46+5:302014-05-15T00:07:30+5:30
एसटी आणि ४0७ च्या अपघातात आठ जण जखमी, चार गंभीर

झाडेगाव चौफुलीवर भीषण अपघात
शेगाव : शेगावपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या झाडेगाव फाट्याच्या चौफुलीवर एस.टी. बस आणि रेती वाहून नेणार्या टाटा ४0७ यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ८ जण जखमी झाले असून यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी १0 वा.च्या सुमारास घडली. खामगाव ते अकोट बस क्रमांक एमएच ४0 एन ८१६५ ही शेगाव येथून अकोटकडे जात असताना विरुध्द दिशेने झाडेगाव फाट्यावरुन रेती घेवून शेगावकडे भरधाव येणार्या टाटा ४0७ क्रमांक एम.एच.१३ जी २६३७ ने प्रवासी घेवून येणार्या बसला जोरदार धडक दिली. यामध्ये वासुदेव रुपचंद टिकार वय ७0 व सौ.प्रभावती वासुदेव टिकार वय ६५ रा. बोरी अडगाव, सुनीता अशोक तायडे वय ४0 व गंगाबाई पुरुषोत्तम तायडे वय ४५ रा. कारंजा रम, लक्ष्मण नारायण जैन वय ५२ रा. जवळा पळसखेड हे जखमी हे जखमी झाले. तसेच टाटा ४0७ मधील जगन्नाथ दौलत फुलकर वय ७0, गोकुळा सखाराम फुलकर वय ४५ व चालक आकाश सखाराम फुलकर वय १८ सर्व रा. पाळोदी हे गंभीर जखमी झाले. जखमींना येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पीएसआय वळवी, महादेव इंगळे यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करुन कारवाई केली.