कॉँग्रेसची संघटनात्मक निवडणुकीसाठी ‘फिल्डिंग’
By Admin | Updated: November 9, 2014 23:27 IST2014-11-09T23:27:10+5:302014-11-09T23:27:10+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष.

कॉँग्रेसची संघटनात्मक निवडणुकीसाठी ‘फिल्डिंग’
बुलडाणा : आघाडीत बिघाडी झाल्याने कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. उमेदवारी न मिळाल्याने काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी पदाचे राजीनामे दिले. एकूणच जिल्ह्यातील चिखली व बुलडाणा विधानसभा सोडल्यास कॉँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता कॉँग्रेसने संघटनात्मक निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार १0 नोव्हेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पदाधिकार्यांची बैठक होऊ घातली आहे. येत्या १४ नोंव्हेबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती असल्यामुळे या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पक्षाची सदस्य ता नोंदणी सुरू होणार असून, हे सदस्यता नोंदणी अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मार्च ते जून या कालावधीत संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पक्षातील पदाधिकार्यांनी कंबर कसली असून, सर्मथकांची जुळवा जुळव सुरू केल्याचे समजते. १५ जानेवारी २0१५ पर्यंत सदस्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीवरील आक्षेप प्रदेश निवडणूक समितीकडे सादर करता येतील. तसेच प्रदेश समितीकडून समाधान न झाल्यास केंद्रीय निवडणूक समितीकडे अपील दाखल करता येईल. २५ मार्च रोजी सदस्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्या त बुथ कमिटींची निवड होईल. मे महिन्यात तालुका कमिटीची निवडणूक होईल. ६ ते २७ जून या कालावधीत जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत.