शेतातील विद्युत पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:36+5:302021-04-08T04:34:36+5:30
डोणगाव पाॅवर हाऊसमधून आंध्रुड व डोणगाव भाग-दोन शेतीतील विद्युत पुरवठा होत असून काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्युत खांब ...

शेतातील विद्युत पुरवठा बंद
डोणगाव पाॅवर हाऊसमधून आंध्रुड व डोणगाव भाग-दोन शेतीतील विद्युत पुरवठा होत असून काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्युत खांब मोडले आहेत. त्यावरील तारा तुटलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबीकडे तत्काळ लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंध्रुड व डोणगाव शिवारातील शेतकऱ्यांनी डोणगावचे शाखा कनिष्ठ अभियंता यांचेकडे केली आहे. आंध्रुड शिवारातील शेतीत कांदा, मूग, भुईमूग, ज्वारी ही पिके पाण्याअभावी सुकत आहे. विहिरीला पाणी नसल्यामुळे बोरवेलमधून पाणी उपसण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित आहे. महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरे व शेतीतील पिके यांचे पाण्याअभावी हाल होत आहे. त्यामुळे या बाबीकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उन्हात पिके जगवायचे कसे
सध्या आंध्रुड व डोणगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला व इतर काही पिकांची लागवड केलेली आहे. परंतु सध्या ऊन जास्त तापत असल्याने आणि त्यात विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे आता पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी या उन्हात पिके जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.