महिला रुग्णाची रुग्णालय परिसरातील इमारतीवरुन उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:58 IST2020-04-30T16:58:32+5:302020-04-30T16:58:42+5:30
या घटनेत महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे.

महिला रुग्णाची रुग्णालय परिसरातील इमारतीवरुन उडी
बुलडाणा : मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका ३८ वर्षीय महिलेने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. दुखापत फारशी गंभीर नसून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका महिलेस गुरुवारी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करुन वॉर्ड क्र. ३ मध्ये तिला भरती करण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर तिने वॉर्डातून पळ काढला. रुग्णालयातील कर्मचाºयांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र खाली उतरुन ती रुग्णालय परिसरात बांधकाम सुरु असलेल्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चढली. तेथून तिने ेखाली उडी घेतली. या घटनेत तिच्या पायाला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.