बलात्कार प्रकरणात महिला डॉक्टरही आरोपी

By Admin | Updated: June 19, 2015 02:33 IST2015-06-19T02:33:38+5:302015-06-19T02:33:38+5:30

संग्रामपूर तालुक्यातील प्रकार; अल्पवयीन पिडीतेच्या गर्भपातास केले सहाय्य.

Female doctor also accused in rape case | बलात्कार प्रकरणात महिला डॉक्टरही आरोपी

बलात्कार प्रकरणात महिला डॉक्टरही आरोपी

संग्रामपूर (जि. बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने गर्भवती झाल्याच्या घटनेत गर्भपातासाठी सोबत केल्याच्या कारणावरुन महिला डॉक्टरला आरोपी केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आरोपींची संख्या पाच झाली आहे. तालुक्यातील काकनवाडा येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने ती गर्भवती झाल्याची घटना उजेडात आली होती. यानंतर पोलिसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.तसेच याप्रकरणी आरोपींना सोबत करुन मुलीचा अवैध गर्भपात करण्यासाठी बुलडाणा येथे पाठविणार्‍या डॉ.वर्षा घाटे अकोला यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत भोजने यांनी १५ जूनपासून पो.स्टे.पासून उपोषण सुरु केले होते. अखेर डॉ.वर्षा घाटे यांना आरोपी केले आहे.

Web Title: Female doctor also accused in rape case