मुलीच्या आग्रहास्तव शौचालय बांधणाºया कुटुंबाचा सत्कार
By Admin | Updated: April 23, 2017 13:47 IST2017-04-23T13:47:43+5:302017-04-23T13:47:43+5:30
मुलीच्याआग्रहास्तव शौचालय बांधणाºया कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

मुलीच्या आग्रहास्तव शौचालय बांधणाºया कुटुंबाचा सत्कार
मोताळा : तालुक्यातील चिंचपूर येथील मराठी प्राथमिक शाळेच्या मुलीच्या
आग्रहास्तव शौचालय बांधणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने
मुल्यवर्धन कार्यक्रम शेलापूर केंद्रातील १२ मराठी माध्यमाच्या
शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. लोकशाहीचा जबाबदार नागरीक घडविणे हा या
कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मुल्ये
उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजविली जात आहेत. माझे
कुटुंब माझ्या जबाबदाऱ्या स्वच्छतेची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून
प्रत्येक घरी शौचालय असावेच, असे महत्व विद्यार्थ्यांना वेळोवळी सांगीतले
जाते.
यातूनच प्रेरणा घेवून म.प्रा.शाळा चिंचपूर या शाळेतील इयत्ता ३ रीत
शिक्षण घेत असलेली कु.नुतन विष्णू धोरण हिने आपल्या घरी शौचालय
बांधण्याचा हट्ट धरला. आई-वडीलांचा शेतमजुरी व्यवसाय. गरीबीमुळे ते शक्य
नव्हते. तरीही मुलीच्या हट्टासाठी आईने स्वत:चे मनी मंगळसुत्र, आजीच्या
पाटल्या इ. दागीने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले व त्यातून शौचालय बांधले.
व त्याचा वापर करीत आहेत. मुलीच्या हट्टासाठी कर्ज काढून शौचालय बांधणारे
हे कुटुंब समाजासाठी आदर्श ठरत असून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून म.प्रा.शाळा चिंचपूर येथे त्यांचा
सहकुटुंब सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता मापारी
हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी पी.एस.मोरे,
केंद्रप्रमुख डी.एस.प्राणकर हे होते. याप्रसंगी नुतन हीस स्कुलबॅग देवून
गटशिक्षणाधिकारी यांनी तिचे कौतूक केले. केंद्रप्रमुख यांनी गणवेशासाठी
आर्थिक मदत दिली. तर मुख्याधापिका निर्मला पाटील यांनी धोरण कुटुंबियांचा
शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तंटामुक्तीचे अध्यक्ष
प्रकाश पांडे, अंगणवाडी सेविका यांनी मुल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यात दिसत
असलेले बदल याबाबत माहिती दिली. संचालन अमर मापारी यांनी केले.
कार्यक्रमास प्रमोद मापारी, माजी अध्यक्ष, शिक्षकवृंद, बाहेकर,
मु.अ.शेलापूर, गावकरी, प्रतिष्ठीत नागरिक व सर्व विद्यार्थी उपस्थित
होते.