सोयाबीन बियाण्याची चणचण

By Admin | Updated: June 12, 2016 02:49 IST2016-06-12T02:49:44+5:302016-06-12T02:49:44+5:30

घरगुती बियाण्यांपासून शेतकरी वंचित : १ लाख ३१ हजार ५0८ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता कमी.

Feeding of soybean seeds | सोयाबीन बियाण्याची चणचण

सोयाबीन बियाण्याची चणचण

ब्रह्मनंद जाधव / बुलडाणा
गतवर्षी सोयाबीन उत्पादनात मोठय़ा प्रमाणावर घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांकडे सोयाबीनचे घरचे बियाणे उपलब्ध नाही, तसेच बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून, १ लाख ४५ हजार ८५५ क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी आहे; मात्र जिल्ह्यात केवळ १४ हजार ३४७ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याने मागणीच्या तुलनेत सुमारे १ लाख ३१ हजार ५0८ क्विंटल सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना आता सोयाबीन बियाण्याची चणचण असल्याने बियाणे मिळविण्यासाठी परवड होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील जवळपास ७0 टक्के शेतकरी सोयाबीन पीक घेतात; परंतु गत तीन वर्षांपासून पावसाच्या हुलकावणीचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन उत्पादनात ७५ टक्के घट झाली, तर ज्या शेतकर्‍यांच्या शेतात सोयाबीन आले तेदेखील ज्वारीच्या आकाराचेच झाले. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ४८ हजार हेक्टर असून, यंदा कृषी विभागाने ७ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे, तर गतवर्षी सोयाबीन पेरणीसाठी ३ लाख ४४ हजार ९६0 हेक्टरचे नियोजन होते. यंदा ३ लाख ७८ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे नियोजन करण्यात आले आहे, तर इतर क्षेत्रावर ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, कापूस आदी पिके घेण्यात येणार आहेत; परंतु गतवर्षी सोयाबीन उत्पादनाला फटका बसल्याने शेतकर्‍यांकडे यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी सोयाबीनचे घरचे बियाणेच उपलब्ध नाही, तसेच जिल्ह्यात १ लाख ४५ हजार ८५५ क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी असून, केवळ १४ हजार ३४७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत सुमारे १ लाख ३१ हजार ५0८ क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकर्‍यांना बियाण्याची कमतरता भासणार आहे.


 

Web Title: Feeding of soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.