शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे पितापुत्राची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:08 IST

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व  गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत  भाड्याच्या घरात राहणार्‍या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान,  या बंगाळे कुटुंबातील चौघांनी वर्षभरात गळफास घेऊन आत्महत्या  केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आ

ठळक मुद्देवर्षभरात कुटुंबातील चौघांनीही संपवले जीवन कौटुंबिक अस्वस्थतेतून घटना घडल्याचा कयास

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व  गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत  भाड्याच्या घरात राहणार्‍या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान,  या बंगाळे कुटुंबातील चौघांनी वर्षभरात गळफास घेऊन आत्महत्या  केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक स्तरावर आकस्मिक मृ त्यूची नोंद केली असून, मृत पिता-पुत्राचे पार्थिव मेहकर येथे  शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर  या प्रकरणातील गूढ उकलले जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त  केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कौटुंबिक स् तरावरील अस्वस्थेतून या आत्महत्या झाल्याचे सकृतदर्शनी समोर येत  आहे. संतोष नारायण बंगाळे (वय ६५) आणि त्यांचा मुलगा लक्ष्मण संतोष  बंगाळे असे आत्महत्या करणार्‍या दोघांची नावे आहेत. लक्ष्मणचा  नवव्या वर्गात हिवरा आश्रम येथे शिकणारा मुलगा चैतन्य यानेही गेल्या  वर्षी राखीपौर्णिमेदरम्यान शिंदी येथे घरातच गळफास घेऊन आत्महत्या  केली होती तर लक्ष्मणची १७ वर्षांची मुलगी सोनाली हिनेही गळफास  घेऊनच दिवाळी दरम्यान आत्महत्या केली होती. त्यावेळी  चैतन्य हा  गावी आला होता तर लक्ष्मण हा दिंडीमध्ये शेगाव येथे गेला होता. त्या  रात्री लक्ष्मणने चैतन्यला फोन लावला होता. त्यानंतर त्याच रात्री चै तन्यने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. कुटुंबातील चौघांनी  वर्षभरात गळफास घेऊनच आत्महत्या केल्याने या प्रकरणाबाबत सध्या  साखरखेर्डा परिसरात  उलटसुलट चर्चा होत आहे. कौटुंबिक स् तरावरील अस्वस्थतेतून या आत्महत्या झाल्या असाव्यात, असा कयास  पोलिसांचा असला तरी जो पर्यंत या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल ये त नाही आणि मृतांचे कुटुंबीय याबाबत काही जबाब देत नाही तोपर्यंत या  पिता-पुत्रांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट होऊ शकत नाही, असे  साखरखेर्डा पोलिसांचे म्हणणे आहे.

लक्ष्मण भाड्याच्या घरात राहत होता!लक्ष्मणच्या मुला-मुलींनी आत्महत्या केल्याने लक्ष्मण पत्नीसह  साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये (पोलीस गल्लीत)  भाड्याच्या घरात काही महिन्यांपूर्वी राहण्यास आला होता. त्यातच त्याचे  पत्नीशी खटके उडत असल्याने दोन दिवसांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी  निघून गेली होती. पती-पत्नीचा वाद पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचला हो ता. मृत लक्ष्मणच्या पत्नीने पोलिसांत यापूर्वी दोनदा तक्रार केली होती. ते  प्रकरण पोलिसांनी चौकशीवर ठेवले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

एक दिवसापूर्वीच आले होते वडीललक्ष्मण साखरखेर्डा येथे रहावयास आल्यानंतर पती-पत्नीत वाद  झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. दरम्यान, लक्ष्मणचे वडील संतोष  नारायण बंगाळे हे एक दिवसापूर्वीच साखरखेर्डा येथे आले होते; मात्र  २५ फेब्रुवारीला मध्यरात्री या पिता-पुत्रांनी गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची बाब २६ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस  आली. दरम्यान, या प्रकरणची गंभीरता पाहता साखरखेर्डा पोलिसांनी  घटनास्थळाचे चित्रीकरण करीत पंचनामा केला असून, दोन्ही पार्थिव  मेहकर येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. दरम्यान, या  कुटुंबाकडे परिसरात नऊ एकर शेती असल्याचीही माहिती आता समोर  येत आहे.

लक्ष्मण तापट स्वभावाचाकौटुंबिक स्तरावरील अस्वस्थतेून ही घटना घडली असावी. मृतांच्या  कुटुंबातील चैतन्य व सोनाली या दोन अपत्यांनीही गेल्या काही काळात  आत्महत्या केली होती. संतोष बंगाळे आणि  लक्ष्मण बंगाळे यांनी आ त्महत्या केलेल्या खोलीचे दार आतून बंद होते. त्यामुळे त्रयस्ताकडून  घटना घडविण्यात आल्याची शक्यताही  नाही. शवविच्छेदन अहवाल  आणि नातेवाइकांच्या जबाबानंतरच या घटनेमागील  कारणे स्पष्ट होऊ  शकतात. प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  लक्ष्मण हा तापट स्वभावाचा होता. मद्य प्राशनाव्यतिरिक्त त्यास दुसरे  व्यसन नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याचे  साखरखेर्डा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे  यांनी सांगितले. 

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाSuicideआत्महत्या