खर्चाला पैसे मागणाऱ्या वडिलास मारहाण, मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Updated: September 10, 2023 17:04 IST2023-09-10T17:03:35+5:302023-09-10T17:04:10+5:30

पुढील तपास बीट जमादार यांच्याकडे देण्यात आला आहे.

father Beaten by sons for asking money, case filed | खर्चाला पैसे मागणाऱ्या वडिलास मारहाण, मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

खर्चाला पैसे मागणाऱ्या वडिलास मारहाण, मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव (बुलढाणा) : खर्चासाठी पैसे मागणाऱ्या वडिलास दोन मुलांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील अटाळी येथे शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी मुलांविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटाळी येथील गजानन काशीराम भांडवलकर (४८) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये मोठ्या मुलाला खर्च करण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी त्याच्यासह लहान मुलाने तुम्हाला नेहमीच पैसे लागतात, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण करत व किचनमधील चाकूने हल्ला केल्याचे म्हटले. त्यानुसार योगेश गजानन भांडवलकर (२३), ज्ञानेश्वर गजानन भांडवलकर (१९) दोघेही रा. अटाळी यांच्यावर पोलिसांनी भादंविच्या ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बीट जमादार यांच्याकडे देण्यात आला आहे.

Web Title: father Beaten by sons for asking money, case filed