ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
By Admin | Updated: October 27, 2014 23:27 IST2014-10-27T23:27:19+5:302014-10-27T23:27:19+5:30
सोयाबीन काढणीच्या हंगामात ढगाळ वातावरणामुळे हातचे पिक जाण्याची भिती.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
बुलडाणा : ऑक्टोबर हिटमध्ये कडक उन्हाचे चटके बसण्याऐवजी यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागात पाऊस पडल्याने शे तकर्यांना धडकी भरली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिकांना पावसाची आवश्यकता होती; मात्र पावसाऐवजी त्यावेळी कडक ऊन्ह तापल्याने सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम झाला. विविध किडींच्या प्रकोप आणि ऐन शेंगा भरण्याच्या काळात पाऊस नसल्यामुळे दाणे बारीक पडून पीक उद्ध्वस्त झाले; मात्र आता सोयाबीन काढणीला आला आणि आकाशात ढग जमायला लागले. सोयाबीन सारखीच कपाशीची स्थिती आहे. पाऊस आल्यास फुटलेले बोंड पावसामुळे मातीत मिसळण्याची भीती आहे. अशा स्थितीत कापूस आणि सोयाबीन आता पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.