घरबसल्या मिळणार शेतकर्‍यांना सातबारा

By Admin | Updated: June 27, 2014 00:28 IST2014-06-26T23:54:15+5:302014-06-27T00:28:16+5:30

संगणकीकृत सातबारा : अमरावती विभागात खामगाव राहणार अव्वल

The farmers will get Rs | घरबसल्या मिळणार शेतकर्‍यांना सातबारा

घरबसल्या मिळणार शेतकर्‍यांना सातबारा

नाना हिवराळे / खामगाव
सातबारा घेण्यासाठी आता शेतकर्‍यांना पटवार्‍याकडे जाण्याची गरज राहणार नाही. महा ई-सेवा केंद्रातून जरी शेतकर्‍यांना सद्यस्थितीत सातबारा मिळत असला तरी शेतीविषयक आवश्यक १४ अहवालांची पूर्तता १00 टक्के पूर्ण नसल्याने शे तकर्‍यांना सातबारा अडचणीचा ठरत आहे. तेव्हा मुळ रेकॉर्ड दुरूस्तीचे काम खामगाव तहसीलमध्ये युध्दपातळीवर सुरु असून येत्या १ ऑगस्टपासून शे तकर्‍यांना ऑनलाईन घर बसल्या सातबारा मिळणार आहे.
राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम चालु आहे. शेतकर्‍यांना सातबारा मिळण्यासाठी तसेच इतर शेतीविषयक कामासाठी तलाठी यांचेकडे चकरा माराव्या लागत होत्या. तलाठी अनेकदा गरीब शेतकर्‍यांकडून जास्तीचे पैसे घेवून शेतकर्‍यांना वेठीस धरत होते. तेव्हा शासनाच्या इतर विभागाचे सर्व काम ऑनलाईन व्हावे याकरीता गेल्या अनेक वर्षापासून सातबारा संगणकीकरणाचे काम चालु आहे. डिसेंबर २0११ अखेर खामगाव तालुक्यातील ४0 गावांची माहिती संगणकात उपलब्ध होती. वेळोवेळी सातबार्‍यात होणारी दुरूस्ती, जुने रेकॉर्ड, बँकेचा कर्जाचा बोझा, फेरफार, पेरे पत्रक यांच्या अहवालाचा मेळ बसत नसल्याने संगणकीकृत सातबारा अडचणीचा ठरत होता. तेव्हा महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ प्रमाणे मुळ रेकॉर्डमध्ये दुरूस्ती करण्याचे पाऊल शासनाने उचलले आहे. यामध्ये अमरावती विभागातून खामगाव तहसीलचे मुळ रेकॉर्ड दुरूस्तीचे काम युध्दपा तळीवर सुरू आहे. खामगाव तालुक्यात एकूण १४६ महसुली गावांचा समावेश आहे. तालुक्यात खामगाव, आवार, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव, पिंपळगाव राजा, पळशी बु., अटाळी, वझर, पारखेड व अडगाव असे ११ मंडळ व ६२ साझे आहेत. १४६ गावात ३३ हजार ३१0 शेतीगट असून आतापर्यंत ३२ हजार ५६ गटाची दुरूस्ती झालेली आहे. तर १ हजार २५४ गटाच्या दुरूस्तीचे काम तहसीलमध्ये सुरू आहे. शेतीचा सातबारा पडताळणी करताना आवश्यक असलेल्या १४ अहवालांची पूर्तता झाल्यानंतरच ते रेकॉर्ड ऑनलाईन होणार आहे. या रेकॉर्डमुळे शेतकरी सातबारा तहसील कार्यालय, तलाठय़ाजवळील लॅपटॉप, महा ई सेवा केंद्र वा घरबसल्या वेबसाईटवरून ऑनलाईन काढू शकतील.

Web Title: The farmers will get Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.