शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

फुलकोबी’ उत्पादनातून सावरतोय शेती व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:38 IST

खामगाव : खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देएक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत.अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे. 

- देवेंद्र ठाकरेखामगाव : कोरडवाहू  तर कोरडवाहूच... पण ज्यांच्याकडे सिंचनाची थोडीबहूत सोय आहे, अशा शेतकºयांनाही शेती  परवडेनासी झाली आहे.  आपल्याकडे बागायतदार शेतकरी ज्या पिकाकडे उत्पन्नाची हमी देणारे पिक म्हणून पाहतात, ती कपाशी सुध्दा गेल्या काही वर्षांपासून  दगा देत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.कोरडवाहू शेती गेल्या अनेक वर्षांपासून पिकेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस साथ सोडत चाललेला निसर्ग अन् त्यातून अपुरा तसेच लहरी स्वरूपाचा पडणारा पाऊस यामुळे कोरडवाहू शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी थोडी का होईना सिंचनाची व्यवस्था करून घेतली आहे. सिंचनाची व्यवस्था झाली, तरी यामाध्यमातून पारंपारिक कपाशीचे पिक घेण्याकडेच शेतकºयांचा कल राहीला आहे. परंतु अलीकडे रोगराईने पिकाची होत चाललेली वाताहत पाहता, कपाशी सुध्दा शेतकºयांची निराश करत आहे. त्यातच गेल्या वर्षी बोंडअळी आली अन् कपाशीाबाबत शेतकरी अधिकच सावध झाले. यातूनच एक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत. खामगाव तालुक्यात साधारणपणे अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.  परंतु भाजीपाल्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अलीकडे वांगे, टमाटे या पिकांसोबतच फुलकोबीची गोडी लागली आहे.  हे पिक शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न मिळवून देणारे ठरत असून यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे. 

एकरी लाखाचे उत्पन्न मिळवून देणारे पिकआपल्याकडे दोन ‘सिझन’ मध्ये फुलकोबीचे पिक घेतल्या जाते. पावसाळ्यात सुमारे ६० ते ६५ क्विंटल कोबीचे उत्पन्न एक एकर शेतीत होते. हिवाळ्यात हेच उत्पन्न १२५ ते १५० क्विंटलवर पोहचते. दोन्ही सिझन मिळून १ लाख ५० हजार  रूपयांचे उत्पन्न होते. यातून खर्च वजा जाता १ लाख रूपये निव्वळ नफा मिळतो, असे शेतकºयांचे म्हणने आहे.

‘कोबी’लाही सतावतो ‘खोडकीडा’इतर पिकांप्रमाणेच फुलकोबी पिकावरही रोगराई येतेच. त्यात पावसाळ्यात खोडकिडा जास्तच त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून बुरशी नाशक औषधाचा वापर शेतकरी करतात. परंतु उत्पन्नासाठी कोबी चांगला पर्याय असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.

फुलकोबी शेतीतून चांगले उत्पन्न मिळते.  तशी याआधीही कोबीची लागवड होतीच,  मात्र सध्या इतर पिके दगा देत असल्याने कोबीचे क्षेत्र वाढविले आहे.गजानन चोपडे,शेतकरी घाटपुरी

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी