बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: July 9, 2017 10:08 IST2017-07-09T09:38:20+5:302017-07-09T10:08:03+5:30
कर्जाला कंटाळून परमेश्वर वासुदेव धुळे (वय ३५ वर्षे) या शेतकर्याने येरळी शिवारात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.

बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा (बुलडाणा) : कर्जाला कंटाळून परमेश्वर वासुदेव धुळे (वय ३५ वर्षे) या शेतकर्याने येरळी शिवारात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. मृतक धुळे यांच्याकडे तीन एकर शेती होती. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज थकीत होते. कर्जाला कंटाळून त्यांनी येरळी येथील एका शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. याबाबत सुरेश नामदेव धुळे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.