शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतोय

By Admin | Updated: July 14, 2015 02:08 IST2015-07-14T02:08:21+5:302015-07-14T02:08:21+5:30

एक दशकात बुलडाणा जिल्ह्यात १५९७ आत्महत्या.

Farmer's suicide rate is increasing | शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतोय

शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतोय

हर्षनंदन वाघ /बुलडाणा : पावसाअभावी शेती नापीक झाली, म्हणून कर्ज काढून पुन्हा पेरणी केली; मात्र पावसाने दगा दिला. पुन्हा बँकेचे कर्ज काढले, असा हा कर्जाचा डोंगर शेतकर्‍याच्या डोक्यावर वाढत गेला आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. या फेर्‍यातून जे सावरले नाही, त्यातील काहींनी विषारी द्रव्य घेऊन जीवन संपवले तर काहींनी गळफास लावून भरल्या संसारावर पाणी सोडले. अशा बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडुन जी मदत मिळावयास पाहिजे होती तिलाही प्रशासनाने निकषांचा ह्यफासह्ण लावला आहे. मागील १0 वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील १५९७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आत्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६३५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९१४ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे पात्रपेक्षा अपात्रतेचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळु शकला नाही. बुलडाणा जिल्ह्यात सन २00१ ते १२ जुलै २0१५ पर्यंत नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १५९७ शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शासन दप्तरी नोंद आहे. या आत्महत्येतील शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ६३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली असली ९१४ आत्महत्यांमध्ये निकषाचाच फास आडवा आला आहे. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पाऊस जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान केले. तर खरिपाच्या हंगामात जून महिना पुर्णत: कोरडा गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे.

Web Title: Farmer's suicide rate is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.