विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: November 9, 2014 23:51 IST2014-11-09T23:33:31+5:302014-11-09T23:51:37+5:30
मेहकर तालुक्यातील घटना, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कारणीभूत.

विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील रत्नापूर येथील एका ३0 वर्षीय शेतकर्याने शेतातील नापिकीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नापूर येथील विलास दत्ता काटोळे (३0) यांना यावर्षी शेतीमध्ये उत्पन्न झाले नाही. तसेच त्यांच्यावर कर्जही होते. नापिकी व कर्ज अशा दुहेरी संकटात शेतकरी विलास दत्ता काटोळे सापडले होते. त्यामुळे विलास काटोळे यांनी स्वत:च्या घरात विषारी औषध प्राशन केले. सदर प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उ पचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, आज दुपारी विलास काटोळे यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात कैलास दत्ता काटोळे (३५) यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा सिंदखेडराजा येथे निषेध मोर्चा, आरोपींना अटक करण्याची मागणी. सिंदखेडराजा (बुलडाणा): अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडा येथील जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमगर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. जवखेडा (खालसा) येथे तिहेरी दलित हत्याकांड झाले. या हत्याकांडाचा निषेध म्हणून येथील भीमगर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातून मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर स्थानिक राजवाड्यासमोर सभेत करण्यात आले. त्यानंतर घटने तील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उ पविभागीय अधिकारी डॉ. विवेक घोडके यांना देण्यात आले.