पिंप्री आंधळे येथील शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: November 8, 2014 23:53 IST2014-11-08T23:46:05+5:302014-11-08T23:53:02+5:30
देऊळगावराजा तालुक्यातील घटना, विष प्राषणकरून संपविली जीवनयात्रा.

पिंप्री आंधळे येथील शेतक-याची आत्महत्या
देऊळगावराजा (बुलडाणा): तालुक्यातील पिंप्री आंधळे गावात नापिकी व आर्थिक संकटाचा बोझा यामुळे त्रस्त होऊन शेतकरी राजेंद्र बाळाजी आंधळे वय ४४ यांनी विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपवली.
पीक लागवडीसाठी आलेला खर्च व बँकेचे असलेले कर्ज यामुळे मानसिक तणाव वाढल्याने शेतकरी राजेंद्र बाळाजी आंधळे यांनी रात्री ८.३0 च्या सुमारास घरातच विषारी औषध प्राशन केले. त्यांचा मुलगा विकासला हा प्रकार दिसताच त्याने तातडीने देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जालना येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.