शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीतील पिके वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:20 IST

रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची सरासरीच्या ९० टक्के पेरणी झाली आहे. सध्या काही भागातील पिके सुस्थितीत असून अनेक ठिकाणी विविध रोगांनी हल्ला केला आहे. यामुळे शेतकरी महागड्या औषधांची फरवारणी करताना दिसत आहे. एकंदरीतच रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जमिनीमध्ये भरपूर ओलावा निर्माण झाल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण होते. तरीसुद्धा अनेक ठिकाणी शेतजमिनी ओली असल्याने रब्बी हंगामातील पिकांची उशीरा पेरणी झाली. उत्पादनात घट येण्याची भिती व्यक्त होत असल्याने अनेक शेतकºयांच्या मनात लागवडीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने सुरूवातील कमी असलेला रब्बी हंगामातील पिकांची लागवड करणाºया शेतकºयांचा आकडा वाढला. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान आता रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून काढता येईल, अशी शेतकºयांना आशा होती. काही ठिकाणी याचे फलीतही होताना दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, रब्बी ज्वारी या पिकांवर विविध रोगांनी हल्ला आहे. हरभºयावर घाटेअळी तर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे सदर पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी करूनदेखील परिणाम होत नसल्याने शेतकºयांमध्ये धास्ती भरली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गहू व हरभरा पिकाला बसत आहे. यामुळे शेतकºयांवरील आर्थिक संकटात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.पिकांवरील रोंगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. यामुळे उत्पादन खर्चामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मात्र या औषधांचा पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. यामुळे पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकºयांची चांगलीच दमछाक होत आहे. परिणामी उत्पादना घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी