नाफेडच्या केंद्रावर तुर खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 13:39 IST2017-04-16T13:39:16+5:302017-04-16T13:39:16+5:30

तालुक्यातील शेकडो शेतकºयांची केंद्रावर एकच गर्दी झाल्यानेकाहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला.

Farmers' rush for buying buffer at NAFED center | नाफेडच्या केंद्रावर तुर खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

नाफेडच्या केंद्रावर तुर खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

मेहकर : नाफेडच्या वतीने तुर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे शनिवार
१५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला
होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने
काहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान आ. संजय रायमुलकर, सभापती माधवराव
जाधव आणि तहसिलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी जावून शेतकऱ्यांची समजूत
काढत मालाची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले. शेतकऱ्यांचा सर्व माल
नाफेडने खरेदी करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा
ईशारा आ. रायमुलकर यांनी दिला.
 नाफेड मार्फत तुर खरेदी सुरू झाल्यानंतर बारदान्याचा तुटवडा निर्माण
झाल्याने मध्यंतरी तुर खरेदी बंद झाली होती. त्यावेळी शिवसेना व बाजार
समितीने संबंधीतांशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून दिला होता. ही अडचन
सुटत नाही तोच, मेहकरचे धान्य गोदाम फुल्ल झाले होते. तेव्हा नांदुरा
येथील गोदामात माल साठविण्याचे ठरले होते. शेतकऱ्यांचा माल दररोज बाजारात
येत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून बाजार समितीने नाव नोंदणीची व्यवस्था
सुरू केली होती. या दरम्यान नाफेडने १५ एप्रिल सायंकाळी ५ वाजे पर्यंत
तुर खरेदी करण्यात येईल असा आदेश जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी
काढल्याने १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी  एकच गर्दी करून जवळपास ५००
ट्रॅक्टर माल नाफेड खरेदी केंद्रावर आणला होता. आपल नंबर आजच लागावा
यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे आ. संजय रायमुलकर, सभापती
माधवराव जाधव, दत्ता पाटील शेळके, उप सभापती बबनराव तुपे, खविसचे विनोद
बापू देशमुख, रविकुमार चुकेवार, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख,
भास्करराव घोडे, गजानन तात्या कृपाळ, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर आदिनी
तहसिलदार संतोष काकडे यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन
घेण्यात आल्या. त्यानुसार ५ वाजे पर्यंत बाजार समिती यार्डात तुर घेवून
येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येवून तुर खरेदी करण्यात
येईल असे आश्वासन देण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पांढरी तुर खरेदी केल्या
जात नाही. अशी तक्रार करताच सदर तुर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांची तुर खरेतदी करणे हे नाफेडचे काम असून मेहकर तालुक्यातील
प्रत्येक शेतकऱ्यांची तुर नाफेड खरेदी करेल. त्यात अडथळा आल्यास
शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा आ. संजय रायमुलकर यांनी
उपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर दिला. तसेच शासनाने तुर खरेदीसाठी बारदाना,
धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे व तुर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी
अशीही मागणी आ. रायमुलकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers' rush for buying buffer at NAFED center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.