शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली-खामगाव महामार्गाच्या कडेला शेतकर्‍यांनी पुकारले बेमुदत उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:54 IST

चिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. 

ठळक मुद्देसंपादित जमिनीचा मोबदल्यासाठी दहिगाववासियांनी सुरू केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. खामगाव ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही महिन्यांपासून युद्धस्तरावर  सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत २४ मीटर रस्ते तयार करण्यात येत असताना यामध्ये रस्त्याच्या कडेवरील शेतकर्‍यांच्या जमिनीचा ताबा कोणत्याही अधिग्रहणाशिवाय परस्पर घेतला जात आहे, तसेच नियोजित २४ मीटर रुंदीपेक्षा जास्त  रुंदीचे मोजमाप करून जमीन ताब्यात घेतली असल्याचा आरोप दहिगाव येथील शेतकर्‍यांनी केला असून, याबाबत १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन याबाबत तातडीने न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. तसेच रस्ता रुंदीकरणांतर्गत होणार्‍या कामामुळे व वाहनांनासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यामुळे उडणारी धूळ आजूबाजूच्या शेतातील हरभरा, गहू, वाल, यासारख्या पिकाचे नुकसान करीत आहे. सदर झालेल्या नुकसानाची मोका पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीसुद्धा शेतकर्‍यांनी केली असून, या मागणीची दखल न घेतल्याने दहिगाव येथील बळीराम नारायण खरपास, भास्कर मोतीराम खरपास, दिलीप देवलाल बेदकर यांच्यासह संतोष रसाळ, दिलीप  खरपास, विजय होगे यांनी २६ जानेवारीपासून रस्त्याच्या कडेला आमरण उपोषण चालविले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून, प्रशासनाने शेतकर्‍यांच्या उपोषणाची दाखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानीचे नितीन राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे, तालुकाध्यक्ष शेख मुखतर, अमोल तेलांगरे, भागवत म्हस्के रामेश्‍वर परिहार, दीपक  धनवे, राम अंभोरे यांनी दिला आहे, तर अन्यायकारकरीत्या शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावून शासन शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असेल, तर शेतकर्‍यांना न्याय मिळविण्यासाठी शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका प.स. सदस्य उषा उद्धव थुट्टे यांनी जाहीर केली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावchikhali roadचिखली रोडFarmerशेतकरीagitationआंदोलन