शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 17:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  

बुलडाणा:  कापासाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाऱ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायेभंग आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  ‘शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, आमचं वावर आमची पावर, खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, भीक नको घेवू घामाचे दाम..’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बियाण्याची पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये लागवड केली. शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य नामदेवराव जाधव यांनी एचटीबीटीच्या कापसाच्या वाणाचे फायदे सांगून शासानाचा धोरणाचा निषेध केला. यावेळी जि.प.माजी सदस्य एकनाथ पाटील थुट्टे म्हणाले केंद्र सरकारचा हा शेतकरी विरोधी बियाणे प्रतिबंधीत कायदा आम्ही धुडकावत लावुन भरोसा या गावातील शेतकºयांनी प्रतिबंधीत बियाण्याची लागवड करून कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. शेतकºयांनी या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या तोडण्यासाठी संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वामनराव जाधव यांनीसुध्दा शेतकºयांना संबोधित केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर जाधव, देविदास कणखर, समाधान कणखर, डॉ. विनायक वाघ, ज्ञानदेव साळवे, विश्वनाथ जाधव, शामराव जाधव, हरिदास खांडेभराड, गणेश ताठे, गणेश वाघ, बालाजी जाधव, डॉ. देविदास भगत, रतिराम शेळके, सुभाष चेके, पुंजाजी मुजमुले, प्रदूम्न  सोनटक्के, दत्तू पाटील टेकाळे, शेषराव पाटील शेळके, कलीमसेठ जमादार, सादीक देशमुख, आत्माराम पाटील कुटे, सुरेश पाटील धंदर, सुखदेव नरोटे, रामदास शेळके, राजु शेळके, दिनकर टेकाळे, मुरली महाराज येवले, प्रताप जाधव, विठ्ठलराव सोळंके, राजु शेटे, भानदास पाटील घुबे, आत्माराम गाढे, संतोष परिहार यांनी सहभाग नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

 शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले-जाधवएचटीबीटीच्या कापसाच्या वाणाला केंद्र सरकाने बंदी आणली असून शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव यांनी केला. शेतकऱ्यांनी शेतात कोणते पीक व वाण पेरायचे याचे स्वातंत्र्य शेतकºयांना असले पाहिजे, असे सांगूण जाधव म्हणाले की, प्रगत देशामध्ये जनुकीय परीवर्तीत केलेल्या मका, कापूस, तांदूळ, सोयाबीन या पिकांना परवानगी आहे. मात्र भारत सरकारने यावर बंदी आणली आहे. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होणार आहे. जगाच्या स्पर्धेत जग टिकायचे असेल तर शेतकºयांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. एकीकडे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा वापरायची तर दुसरीकडे जीएम बियाण्यावर बंदी आणून शेतकरी विरोधी धोरण राबवायचे हे आता शेतकरी सहन करणार नाहीत, असे मत शेतकरी नेते नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी