शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वीज कनेक्शन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मिळेना 'कोटेशन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 14:17 IST

संग्रामपुर : गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची आॅनलाइन प्रणाली ठप्प असल्याने नवीन पंप धारक शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची आॅनलाइन प्रणाली ठप्प असल्याने नवीन पंप धारक शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. नवीन वीज कनेक्शन मिळवण्यासाठी शेतकºयांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवून सुद्धा कोटेशन मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.शेतीपंपाला नवीन विज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकºयांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कर्जबाजारी होऊन शेतकºयांनी शेतामध्ये विहिरी खोदल्या व त्यावर नवीन पंप बसवले परंतु त्याचा फायदा सध्या तरी शेतकºयांना होत नाही. कनेक्शन नसल्याने मोटर पंप बंद अवस्थेत आहे. याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे. सध्या स्थितीत सर्वत्र दुष्काळ असल्याने शेतकरी देशोधडीला टेकला आहे.शासन स्तरावरून शेतकºयांच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलण्याऐवजी शेतकºयांना वेठीस पकडण्याचा प्रकार समोर आला आहे जून महिन्यापासून नवीन वीज पंप धारकांना कोटेशन मिळत नसल्याने त्यांना वीज कनेक्शन पासून वंचित राहावे लागत आहे. ही परिस्थिती संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिसून येत आहे. शेतामध्ये नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी शेतकरी कागदपत्राची पूर्तता करून महावितरण कंपनी कार्यालयात जात आहेत. वितरण कंपनीकडून शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यात येतात परंतु अर्ज आॅनलाईन करतेवेळी आॅनलाईन प्रणालीत कोटेशनचे आॅप्शन बंद असल्याने त्यांना कोटेशन काढता येत नाही. त्यामुळे शेतकºयांचे अर्ज धूळ खात पडत आहेत संग्रामपूर तालुक्यात हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे.  संग्रामपूर तालुक्यात शासन स्तरावरून गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर जाहीर करण्यात आला. परंतु दुष्काळावर उपाययोजना शून्य असल्याने घोषणा करून शासन मोकळे झाल्याचे दिसून येत आहे. विज जोडणी साठी १०० ते सव्वाशे अर्ज प्रलंबीत आहेत. 

 

 नविन वीज कनेक्शन साठी आॅनलाईन अर्ज भरण्यात येतात. परंतु पाच ते सहा महीण्यापासून आॅनलाईन  प्रक्रियेत कोटेशनचे  आॅप्शन उघडत नाही. त्यामुळे कोटेशन देणे बंद आहेत. आॅनलाईन प्रक्रीया सुरळीत होताच शेतकºयांना तातडीने कोटेशन देण्यात येतील.- एस. बी. नवलकरउपकार्यकारी अभियंता संग्रामपूर 

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी