ऊस जळाल्याने शेतक-याचे नुकसान
By Admin | Updated: October 24, 2014 23:17 IST2014-10-24T23:17:36+5:302014-10-24T23:17:36+5:30
मेहकर येथील घटना, शेतातील उसाला विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग

ऊस जळाल्याने शेतक-याचे नुकसान
मेहकर (बुलडाणा) : येथील कंचनी महाल परिसरात असलेल्या शेतातील उसाला विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग लागून शेतकर्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. येथील कास्तकार मदनलाल मोदाणी यांचे कंचनी महाल परिसरात शेत आहे. त्या शेतावरून विद्युत तारा गेलेल्या असून, सदर विद्युत तारांचे घर्षण होऊन शेतात असलेल्या उसाला आग लागली. या आगीत शेतातील मोठय़ा प्रमाणावर उस जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशामक दल व खासगी पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणली; परंतु शेतकरी मदनलाल मोदाणी यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.