शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

शेतकऱ्यांनी ठोठावले हायकोर्टाचे दरवाजे!

By admin | Updated: July 6, 2017 00:18 IST

जळगाव जामोदच्या सहा शेतकऱ्यांकडून जनहित याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शासकीय आदेशानुसार, तूर खरेदीबाबत नोंदणी करून टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर अद्यापही खरेदी न करण्यात आल्याने जळगाव जामोद तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका आज, ५ जुलै रोजी दाखल केली आहे. तालुक्यातील २६०० शेतकऱ्यांची सुमारे ६० हजार क्विंटल तुरीची त्वरित खरेदी करून चुकारे करावेत व शेतकऱ्यांना पेरणीच्या प्रसंगी अडचणीतून मोकळे करावे, अशी विनंती या शेतकऱ्यांनी न्यायालयाला केली आहे. या जनहित याचिकेत नाफेड सहकार व पणन खाते, केंद्र शासनाचा कृषी विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह एकूण १२ विभागांवर दोषारोप करण्यात आले आहे.जळगाव जामोद तालुक्यातील तूर खरेदी गत एक महिन्यापासून कोणतीही सूचना संबंधित विभागाने न देता बंद केली आहे. टोकण दिलेल्या शेतकऱ्यांची तूर १० जूनपर्यंत खरेदी करण्यात येईल, असे २ जूनचे शासनाचे परिपत्रक असताना ६ जूनपासून कोणतीही सूचना न देता तूर खरेदी बंद करण्यात आली. तालुक्यात ३६६८ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी १९ मे ते ३१ मे पर्यंत नोंदणी करून टोकन प्राप्त केले होते. त्यापैकी फक्त १०८६ शेतकऱ्यांचीच तूर मोजली, तर उर्वरित सुमारे २६०० शेतकऱ्यांच्या ६० हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्यापही बाकी आहे. सध्या पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना शासनाने अक्षरश: या तूर उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी अखेर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. न्यायालयाकडून सर्व तूर उत्पादकांना त्वरित न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.तूर उत्पादकांना नऊ कोटीचा बसणार फटका! जळगाव तालुक्यातील टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर जर शासनाने खरेदी केली नाही तर या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात रू.३५०० प्रति क्विंटल दराने तूर विकावी लागणार आहे. म्हणजेच एका क्विंटल मागे दीड हजार रूपयाचा तोटा संबंधित शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. टोकन प्रमाणे ६० हजार क्विंटल तूर अजून शेतकऱ्यांकडे बाकी आहे. म्हणजेच नऊ कोटीचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे. यातून आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू होऊ शकते.याचिकाकर्त्यांना सर्व तूर उत्पादकांची चिंताकाँग्रेसचे नेते प्रसेनजित पाटील यांच्या मार्गदर्शनात विश्वास हरिभाऊ पाटील मानेगाव, प्रमोद शहादेव सपकाळ भेंडवड बु., जनार्दन त्र्यंबक भिवटे अकोला खुर्द, महादेव लक्ष्मण तायडे पिंपळगाव काळे, विनोद शहादेव सपकाळ भेंडवड बु. व गजानन बाबाराव चतारे पिंपळगाव काळे, या सहा शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या शेतकऱ्यांची याचिका दाखल करून घेतली. याचिकाकर्त्यांनी त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील टोकनधारक शेतकऱ्यांची तूर त्वरित खरेदी करण्यासाठी शासनाला आदेश देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. म्हणजेच याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्रातील सर्व तूर उत्पादकांची चिंता वाढली आहे.बारा विभागांवर दोषारोपतूर खरेदी अचानक बंद केल्याचा ठपका याचिकाकर्त्यांनी १२ विभागांवर ठेवला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर नाफेड, व्दितीय क्रमांकावर शासनाचे सहकार व पणन खाते, तिसऱ्या नंबरवर पणन संचालक, नंतर विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक बुलडाणा, विदर्भ को-आॅप. मार्केटींग फेडरेशन, जिल्हा पणन अधिकारी बुलडाणा, सहायक निबंधक जळगाव, जळगाव तालुका खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव व केंद्र सरकारचा कृषी विभाग यांचा समावेश आहे. याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड.प्रदीप क्षीरसागर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची तूर खरेदीसंदर्भात याचिका दाखल करणारे हे एकमेव उदाहरण असावे. कोणतीही पूर्व सुचना न देता संबंधित विभागाने तूर खरेदी बंद केल्याने टोकणधारक शेतकरी कृषि उत्पन्न बाजार समितीकडे सारखी विचारणा करीत आहे. आमचे कर्मचारी व मी स्वत: सुध्दा याबाबत उत्तर देण्यास हतबल झाले आहे. अखेर तालुक्यातील काही शेतकरी पुढे आलेत व त्यांना उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली. त्याला माझे पूर्ण समर्थन आहे शेतकऱ्यांचा हा लढा निश्चित यशस्वी होईल.- प्रसेनजित पाटील,सभापतीकृषि उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद.